नवी दिल्ली- भारताची स्टार बॉक्सिंगपटू मेरी कोमने नवी दिल्लीत सुरु असलेल्या जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत ४८ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत युक्रेनच्या एच.ओखोटोचा ५- ० ने पराभव करत सहाव्यांदा सुवर्णपदक पटकावले आहे. सलग सहा वेळेस सुवर्णपदकाची कमाई केल्याने मेरी कोमने आयर्लंडच्या केटी टेलरचा ५ विजेतेपदांचा विक्रम मोडीत काढला आहे.
जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद सर्वाधिक वेळा
जिंकण्याचा विक्रम हा आयरीश बॉक्सर कॅटी टेलरच्या नाववर होता. मात्र मेरीने
सहाव्यांदा सुवर्णपदक जिंकत तीचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या विजयानंतर
मेरी म्हणाली की, आजचा
विजय हा मी देशाला समर्पित केला आहे.
उपांत्य सामन्यात नॉर्थ कोरियाच्या किम ह्यांग मीला ५-० ने
पराभवाचा धक्का देत मेरीने अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला होता. मेरीने
आतापर्यंत जगभरातील विविध बॉक्सिंग स्पर्धांमध्ये पदक पटकावली आहेत. ३५ वर्षीय
मेरीने गेल्या वर्षीच आशियायी चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक पटकावले होते.
त्यासोबतच गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्ण पदकावर तिने
नाव कोरले होते.